ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

स्वाभिमानाला डिवचाल तर जनता माफ करणार नाही : रामकृष्ण वेताळ

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात अपक्षांची आघाडी

कराड :- गेली 22 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करून देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला अन्यायाला आता कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील मतदार मतपेटीतून उत्तर देतील. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सामान्य घटकातील नागरिकांना पक्षाच्या माध्यमातून व व्यक्तिगत अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने मी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कराड तालुक्यातील नेतृत्व पुढे येऊ द्यायचे नाही, असे काही जणांना वाटते. मात्र कराड ही भूमी अन्याय विरुद्ध लढणारी आहे. कराडच्या स्वाभिमानाला डिवचाल तर मतदार आपणास योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका रामकृष्ण वेताळ यांनी शिरवडे येथे झालेल्या प्रचार सभेत केली.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन आबा नलावडे, कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेताळ कोपर्डे हवेली गणाचे अपक्ष उमेदवार अमित प्रकाश पाटील यांच्यासह कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close