ब्रिलियंट अकॅडमीचा आर्यन पाटील JEE मेनमध्ये जिल्ह्यात पहिला

कराड: – कराड येथील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी आर्यन मोहन पाटील याने जेईई मेन २०२६ परीक्षेत ९९.९० पर्सेंटाइल गुण मिळवत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सातत्याने दैदीप्यमान निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट अकॅडमीने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले असून आर्यनसह २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण करून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पाटील, दैनिक ऐक्यचे जाहिरात प्रतिनिधी प्रकाश पिसाळ, मुख्याध्यापिका रुपाली पाटील, भौतिकशास्त्र विभागप्रमुख आदित्य रंजन, रसायनशास्त्र विभागप्रमुख निलेश कुमार, गणित विभागप्रमुख स्वप्नील अगरवाल, जीवशास्त्र विभागप्रमुख नील सर तसेच अकॅडमीचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
जेईई मेनमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आर्यन रुपाली मोहन पाटील (९९.९०), सोहेल नदाफ (९८.४५), सोहम सुप्रिया प्रशांत फणसेकर (९८.१२), बुशारा शबाना अब्दुलमुनाफ वायकर (९५.७३), अलिया अंजुम नजीरअहमद पिरजादे (९५.४६), आर्यन सुनिता दादासो निकम (९३.७८), पियुष अर्चना प्रल्हाद कुंभार (९२.११), अंशुल वर्षा विकास सूर्यवंशी (९१.४०), सुजल सविता महादेव झांबरे (८८.७०), वर्धा अर्चना राजेंद्र चव्हाण (८७.१४), सिद्धी शुभांगी प्रकाश मोरे (८६.८४), आसावरी स्वाती अमर बोंद्रे (८६.३६), समिक्षा सोनाली किशोर भांबुरे (८६.३१), श्रवण वर्षा सारंग जाधव (८५.९५), धनश्री वनिता विजय कावर (८३.८३), आर्यन मानिषा दिनकर धिगारे (८३.४८), ऋद्धी शुभांगी प्रकाश मोरे (८३.३७), संदेश राधिका जालिंदर लोहार (८३.२४), साग्रेश्वर विद्या रमेश थोरात (८२.८५), माधवी शुभांगी संतोष रोकडे (८२.०५), अथर्व संतोष पाटील (८१.६१) आणि वेदांत रुपाली उदय पाटील (७९.४२) यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल ब्रिलियंट अकॅडमीच्या शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे आर्यन पाटील हा ब्रिलियंट फाउंडेशन स्कूलचा पहिला विद्यार्थी असून त्याने जेईई मेनमध्ये सातारा जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. ब्रिलियंट फाउंडेशनद्वारे विद्यार्थ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन होमी भाभा, स्कॉलरशिप, मंथन, बीडीएस आदी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवून देत आहे. स्कॉलरशिप परीक्षेत तालुका प्रथम तर होमी भाभा परीक्षेत जिल्हा प्रथम क्रमांक मिळवून देण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे.
आर्यन यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा क्रमांक ३ येथे झाले असून इयत्ता आठवीपासून त्यांना फाउंडेशन अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पुढील सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम झाला.
संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे की १५ एप्रिलपासून इयत्ता ६ वी ते १० वी फाउंडेशन वर्ग सुरू होत असून पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



