ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात जनतेतून उद्रेक होईल :- रामकृष्ण वेताळ

सिद्धनाथ मंदिरातून विद्याताई वेताळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कराड/ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक व निष्ठेने काम करूनही गेल्या 7 ते 8 वर्षापासून सातत्याने एखाद्या नेत्यावर किती अन्याय करायचा याचे उदाहरण या कराड उत्तरमध्ये समोर येऊ लागले आहे. माझ्यावर होणाऱ्या अन्यायामुळे कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील जनतेतून आता उद्रेक पाहायला मिळेल आणि अपक्ष उमेदवार विद्याताई वेताळ या विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला.

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून विद्याताई रामकृष्ण वेताळ यांची उमेदवारी अपक्ष ठेवण्यात आले आहे. या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ सिद्धनाथ मंदिरातून करण्यात आला.

Oplus_16908288

विद्याताई वेताळ म्हणाल्या, आम्हाला समाजकारणाचा वारसा आहे. आम्ही समाजात काम करताना कधीही राजकारण करत नाही. धार्मिक असो की सामाजिक माझे पती रामकृष्ण वेताळ हे नेहमीच निवडणूक किंवा राजकारण न पाहता सातत्याने लोकांसाठी झटत आले आहेत. यापुढे समाजातील गोरगरिबांची सेवा करायला मिळावी, यासाठी मीही त्यांच्यासोबत प्रत्येक माय बहिणींच्या आणि गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी राहीन असा शब्द देते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close