कराड तालुक्यातील “या” गावात बिबट्याची 4 पिल्ले सापडली

कराड :- तालुक्यातील चचेगाव येथील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची चार पिल्लं आढळून आले आहेत. बिबट्या मादी आणि पिल्लांचे पुर्नमिलन आज संध्याकाळी वन विभागाकडून करण्यात येणार आहे. मात्र, त्या अगोदर आता शेतकरी आक्रमक झाले असून पुर्नमिलन करण्यासोबत बिबट्याला पिंजरा लावून पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.
वन विभागाच्या बदललेल्या नियमामुळे बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. परंतु, ती परवानगी मिळत नसल्याने केवळ पुर्नमिलन करून त्याच ठिकाणी बिबट्याची पिल्ल व बिबट्या मादीचे निवासस्थान राहणार आहे. त्यामुळे, या परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून पुर्नमिलन करण्यासोबत बिबट्या पिंजऱ्यात पकडावा, अशी मागणी केली जात आहे. यावरून बिबट्याचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या वादावादी होऊ लागले आहे.
चचेगाव येथे बिबट्याच्या मादीचा वावर असल्याने गेल्या अनेक दिवसापासून ऊसतोडी राहिल्या आहेत. सध्या एकाच ठिकाणी पंधरा ते वीस एकर ऊस उभा असून तो ऊस तोडताना बिबट्याची पिल्लं ऊसाच्या शेतात आढळून आली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे पिल्ल ताब्यात घेतले आहेत. मात्र, बिबट्याची मादी व पिल्लांचे मनोगत पुनर्मिलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्याकडून बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.