कराडच्या निळकंठ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महिलेस जीवनदान : गुंतागुंतीची 6 तासांनी शस्त्रक्रिया यशस्वी

कराड | पंधरा दिवसापूर्वी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर शस्त्रक्रिया केल्या नंतर लगेच पंधरा दिवसांनी त्या महिलेस पुन्हा उलटीचा त्रास सुरू झाला होता. त्या महिलेस कार्वेनाका (ता. कराड) येथील निळकंठ मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते . त्यावेळी डॉ. संदीप माळी यांनी आजाराचे योग्य निदान करून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या महिलेवर सलग सहा तास अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया करून ऑपरेशन यशस्वी केले आणि महिलेस जीवनदान दिले आहे.
कार्वेनाका (ता. कराड) येथे डॉक्टर संदीप माळी यांचे निळकंठ मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. ते सर्जन स्पेशलिस्ट असून त्यांनी आतापर्यंत अनेक शस्त्रक्रिया यशस्वी केलेले आहेत. तसेच मुळव्याध, भगंदर, फिशर या रुग्णावर लेझरद्वारे त्यांनी 500 हून अधिक यशवंतराव शस्त्रक्रिया केल्या आहेत. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी सौ.धनश्री कलढोणे (वय- 22 रा. मनेराजुरी, ता. तासगाव जि. सांगली) यांना निळकंठ हॉस्पिटलमध्ये सतत उलटी होण्याच्या कारणावरून उपचार करता दाखल करण्यात आले होते. दरम्यान सौ.धनश्री कलढोणे यांच्यावर 29 जूनला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु लगेच पंधरा दिवसात पुन्हा त्यांना तोच त्रास सुरू झाला होता. त्यानंतर निळकंठ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉ. संदीप माळी यांनी त्यांची सोनोग्राफी व सीटीस्कॅन करून वैद्यकीय तपासणी केली.
सदरील पेशंट महिलेच्या पूर्वीच्या ऑपरेशनमध्ये आतड्याला पीळ पडल्याचे निष्पन्न झाले. अतड्याला पीळ पडल्यामुळे महिलेला खाल्लेल्या अन्नाची सतत उलटी होत होती, त्यामुळे रुग्णास जीविताचा धोका निर्माण झाला होता. डॉ. संदीप माळी यांनी धनश्री कलढोणे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत त्यांनी व त्यांचे सहकारी डॉ. सागर खाडे, डॉ. पर्वत खाडे, डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे आणि भूलतज्ञ डॉ. रमाकांत मोहिते या टीमने धनश्री कलढोणे यांच्यावर सलग सहा तास शस्त्रक्रिया करून ऑपरेशन यशस्वी केले आहे. आयसीयु मध्ये असताना डॉ. महेश देशमुख सर्व डॉक्टरांच्या टिमने आणि नर्सिंग व्यवस्थापक सुनील वाघमारे व सर्व स्टाफने सौ.धनश्री कलढोणे यांची काळजी घेत त्यांना मृत्यूशय्येवरुन परत आणत जीवनदान दिले आहे.