आनंदराव चव्हाण विद्यालयाच्या रजनी जाधव यांंची सेवानिवृत्ती

कराड | विशाल वामनराव पाटील
श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेजच्या रजनी रवींद्र जाधव या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पतीसह सत्कार समारंभ संपन्न झाला. संस्थेच्यावतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष शेती मित्र महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष, अशोकराव थोरात, शालीनीताई थोरात व प्रमुख पाहुण्या श्रीमती शैला भिसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गणेश मूर्ती प्रदान करून सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष पी. जी. पाटील, उपाध्यक्ष बी. बी. पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक प्रा. संजय थोरात, वसंत चव्हाण, संचालिका डॉ. स्वाती थोरात, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर. आर. पाटील, एस. वाय. गाडे, माजी उपमुख्याध्यापक अनिल शिर्के, शेखर शिर्के, मलकापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, सौ. शालिनीताई थोरात, सत्कारमूर्ती सौ. जाधव यांचे नातेवाईक, संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मळाईदेवी पतसंस्थेतील शाखाधिकारी, त्यांचे सहकारी, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ ए. एस. कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन सौ एस. ए. पाटील यांनी केले. उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.