ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने नव्याने आयलँड होणारच : शंभूराज देसाई

सातारा। शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता. पूर्वी परंतु आत्ता काढून टाकण्यात आलेल्या आयलँड त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Brilliant Academy

पोवईनाका- सातारा परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड सुशोभीकरण करण्याबाबत आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Kota Academy Karad

युनायटेड वेस्टर्न बँकेचे पूर्वी एक आयलँड होते, हे आयलँड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगीचा यासह अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून आयलँड तयार करण्यात येणार आहे. याबाबत राजघराण्याची काय शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close