एक- दोन नव्हे तब्बल 3 बिबटे घुसले ‘या’ गावात : व्हिडिओ पहा
कराड | कराड तालुक्यातील वराडे येथे बिबट्यानी धुमाकूळ घातलाय. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. यामुळे वराडे गावात सध्या बिबट्याची दहशत आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घराबाहेर कसे पडायचे या चिंतेत ग्रामस्थ आहेत. तर वनविभाग सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे तालुका कराड येथील दत्तप्रसाद इंटरप्रेसच्या सीसीटीव्ही कॅमेरा बुधवारी पहाटे तीन बिबटे कैद झाले. मंगळवारी याच परिसरात असणाऱ्या आनंदराव जाधव यांच्या घरासमोर बांधलेले पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले होते. अनेक महिन्यांपासून डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे मात्र आता बिबटे लोक वस्तीत वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दत्तप्रसाद एन्टरप्रेस कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन बिबटे एकत्रितपणे गावात शिरल्याचे दिसून आले. त्यामुळे पाचावर धारण बसली आहे.
बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नसला तरी लहान मुले व जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान गावकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे मात्र कोणत्याही हालचाली नाहीत. माणसांवर हल्ला केल्यावरच यंत्रणेला जाग येणार का असा सवाल व्यक्त केला जात आहे.