Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Satara Newe : जुन्या वादातून मंगळवार पेठेत धारदार कोयत्याने एकावर वार

कराड । जुन्या वादातून खून करण्याच्या उद्देशाने युवकावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले. शहरातील मंगळवार पेठेत सह्याद्री दूध डेअरीसमोर ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर मंगळवार पेठेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. सुरज धुमाळ, अजय रायते, प्रथमेश बेंद्रे यांच्यासह अन्य एकाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. या हल्ल्यात आयेजरजा अल्ताफ मुजावर (वय- 19, रा. गुरूवार पेठ, कराड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूवार पेठेत राहणाऱ्या आयेजरजा मुजावर याच्या मित्राचा शिवराज माने याच्याशी यापुर्वी वाद झाला होता. या वादानंतर शिवराज माने याच्यासह त्याचे मित्र आयेजरजा याच्या गल्लीतील मुलांना शिविगाळ, दमदाटी करीत होते. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आयेजरजा हा नागरी आरोग्य केंद्रात त्याच्या आजीची औषधे आणण्यासाठी गेला होता. तेथून परत घरी जात असताना सह्याद्री दूध डेअरीसमोर अचानक सुरज धुमाळ व प्रथमेश बेंद्रे या दोघांनी आयेजरजा यांच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी मारली. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादावादीवेळी तुला जीवंत सोडत नाही, असे म्हणून आरोपींनी आयेजरजा याच्यावर दुचाकीच्या डिकीतून आणलेल्या धारदार कोयत्याने वार केले. आयेजरजा याने हे वार चुकवले. त्यावेळी त्याच्या हातावर एक घाव वर्मी लागला. त्यानंतर त्याला फरशीनेही मारहाण केली. या मारहाणीत आयेजरजा गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवले.

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी खुनीहल्ला करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close