कराड ते कर्नाटक खून प्रकरणात एकाला अटक : संशयित आरोपीचे मृतदेह जाळताना हात- पाय भाजले?
कराड | वनवासमाची (ता. कराड) येथे जाळून मारलेल्या युवकाची चार दिवसांनी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. केशवमुर्ती आर चिन्नाप्पा रंगास्वामी (वय- 37, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू) असे त्याचे नाव आहे. तर केशवमुर्तीला निदर्यीपणी जाळून मारल्या प्रकरणात त्याच्याच गावातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मंजुनाथ सी (वय- 33, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळुरू) असे त्याचे नाव आहे. त्या प्रकरणात आणखी दोन संशयीत आहे. त्यांना अटक झालेली नाही. फौजदारी न्यायाधिश एस. ए. विरानी यांनी मंजुनाथला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. केशवमुर्तीच्या खूनानंतर त्याला जाळताना एक संशयीत भाजल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रशांत भिमसे बटवाल (रा. वमनेल-सिंगदी जि. बिजापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा पाय व हात जळाला आहे. त्यामुळे त्याला अद्याप अटक नाही.
पोलिसांनी केशवमुर्ती याच्या खून प्रकरणात अटक केलेल्या मंजुनाथला पोलिस कोठडी मिळाल्याने तपासानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. या खून प्रकरणातील सर्वचजण कर्नाटकातील आहेत. त्यामुळे त्यांच्या खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकाने तीन संशयीतापैकी एकास अटक केली आहे. दुसरा संशयितही पोलिसांना सापडला आहे. मात्र, त्याचा पाय व हात भाजला आहे. खूनानंतर केशवमुर्तीला जाळताना तो भाजल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याला उपचारानंतर अटक होणार आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील वनवासमाचीच्या हद्दीत दि. 28 सप्टेंबरच्या रात्री उशिरा महामार्गातलगतच्या नाल्यात अनोळखी युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिस उप अधीक्षक ठाकूर त्याचा तपास करत आहेत. त्या प्रकरणातील मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र, दोन दिवसात तांत्रिक तपासाह घटनास्थळावर मिळालेल्या माहितीच्या आधारवर पोलिसांनी तपास करत त्या मुतदेहाची ओळख पटविण्यात यश मिळवले आहे. त्याचे केशमुर्ती असे त्याचे नाव आहे. त्याचा बंगळुरातून येथे आणून खून करून मृतदेह जाळण्याचा प्रय़त्न झाला आहे. अत्यंत क्रुरपणे त्याचा खून झाला आहे.
घटनास्थळासह तांत्रिक तपास करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख तर पटवलीच त्यासह त्या खून प्रकरणी पोलिसांनी त्याचाच गावातील एकास बंगळुरात जावून अटक केली आहे. अन्य एकास जखमी अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. खून प्रकरणात तपासासाठी बंगळूरकडे रवाना झालेले पोलिस पथक मंजुनाथला घेवून पहाटे परतले. मंजुनाथला अटक केली. त्याला त्वरीत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. संशयितांनी संबंधित युवकास बंगळूर परिसरात मारहाण करुन खून केला असल्याचा संशय असला तरी नेमकी मारहाण कोठे झाली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह महामार्गावरील वनवासमाचीच्या हद्दीत कसा आणला. तेथेच तो का पेटवला, त्यासाठी डिझेल, पेट्रोल कोठून आणले, संशयित पळून जाताना कसे गेले. त्यात अजून किती लोकांचा सहभाग आहे. खूनाचे कारण काय आहे, या सगळ्याचा तपास पोलिसांना करायचे आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देण्यात आली आहे.