आमच्या गाडीला बीरेक न्हाय : भाजपचे आ. गोपीचंद पडळकरांच नव गाणं, पहा डान्स
सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचं एक गाण चांगलचं व्हायरल होवू लागलं आहे. आमच्या गाडीला बीरेक न्हाय! या गाण्यात चांडाळ चाैकडी फेम रामभाऊ यांच्यासोबत आ. पडळकर हे थिरकताना पहायला मिळत आहे. पवार कुटुंबिय आणि आ. पडळकर यांच्या संघर्षावर हे गाणं तंतोतंत जुळत असल्याने त्यांची सध्या जोरदार चर्चा होवू लागली आहे.
सध्या राज्यातल्या महायुती सरकार सरकारमध्ये अजित पवार सामील झाले असले तरी आमदार श्री. पडळकर आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा संघर्ष पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आ. पडळकर नका वाकड्यात जाऊ, नका आडवं येऊ, बाजूला सरका…. आमच्या गाडीला बीरेक न्हाय!’ याचं गाण चागलंच गाजत आहे. गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील झरे (ता.आटपाडी) गावचे आहेत. साजन बेंद्रे आणि सागर बेंद्रे या बंधूंनी याचं हे गाण चांगलेच व्हायरल होत आहे.
आमच्या गाडीला बीरेक न्हाय!’ या गाण्यात आ. पडळकर यांची एंन्ट्री राजकीय पुढारी म्हणूनच दाखवली आहे. चांडाळ चाैकडी फेम रामभाऊ यांची अॅक्शन आणि फाईटींग गाण्यात दाखवली आहे. या गाण्यामुळे राजकाणारातील चर्चेत असलेले गोपीचंद पडळकर आता मनोरंजन क्षेत्रातही आपली छाप पाडताना दिसत आहेत.