पाटण बाजार समिती निवडणूक : आज 11 जणांची माघार, उद्या चित्र स्पष्ट होणार
पाटण | पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज बुधवारी 11 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. तर काल मंगळवारी 10 जणांनी माघार घेतल्याने आजपर्यंत एकूण 21 जणांनी माघार घेतली आहे. गुरुवारी शेवटच्या दिवशी यापैकी अजून चार उमेदवारांची माघार होऊन प्रत्यक्ष उमेदवार व त्यांची पॅनल याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पाटणकर गटाकडून दाखल उमेदवार अर्जांपैकी सोसायटी सर्वसाधारणमधून:- महेंद्र मगर , महिला प्रतिनिधी सौ. वंदना सावंत , ग्रामपंचायत सर्वसाधारण :- दत्तात्रय कदम , प्रमोद देशमुख , महेंद्र मगर , सचिन माने , आर्थिकदृष्ट्या दुर्बल :- सिताराम मोरे, सचिन माने, अनुसूचित जाती :- आनंदा डुबल, व्यापारी गटातून :- निखिल लाहोटी या 10 तर देसाई गटाकडून एकमेव सोसायटी सर्वसाधारण मधून :- मधुकर सूर्यवंशी असे एकूण 11 उमेदवारी अर्ज माघारी निघाले असून आता 17 जागांसाठी पाटणकर गटाचे 18 तर देसाई गटाचे 20 असे 38 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. गुरुवारी शेवटच्या दिवशी यापैकी अजून चार उमेदवारांची माघार होऊन प्रत्यक्ष उमेदवार व त्यांची पॅनल याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आत्तापर्यंत देसाई गटाकडून दाखल एकूण 31 पैकी 11 उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता या गटाचे 20 तर सत्ताधारी पाटणकर गटाकडून 28 पैकी 11 उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता या गटाचे 18 असे एकूण 38 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत . आता सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण : 15 , महिला प्रतिनिधी 5, इतर मागासवर्गीय 2, भटक्या विमुक्त जाती 2, ग्रामपंचायत सर्वसाधारण 5, अनुसूचित जाती 3, आर्थिक दृष्ट्या दुर्बल 2, अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते 4 असे एकूण 38 उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत .