Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

कराड उत्तरेत परिवर्तन अटळ, प्रचाराला सुरूवात : मनोज घोरपडे

कराड उत्तर मधील पुणे रहिवाशी मतदारांचा कौटुंबिक स्नेह मेळावा

कराड :- कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ आहे. यावेळी निवडणूक लढणारच आणि जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. या परिवर्तनासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. कराड उत्तरचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि तासवडे येथे नवनवीन उद्योग आणण्यासाठी एकवेळ बदल करण्याची आवश्यकता आहे. कराड उत्तर प्रचाराची सुरुवात पाली येथील खंडोबाला नारळ फोडून केली जाते. परंतु आज आकुर्डी येथील खंडोबाला नारळ फोडून प्रचाराचा सुरुवात झालेली असून 2024 ला कराड उत्तरमध्ये परिवर्तन होणार असल्याचा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.

कराड उत्तर मधील पुणे रहिवाशी मतदारांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. यावेळी महेश दादा लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, कामगार नेते शिवाजीराव कणसे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते आबासो चव्हाण, कामगार नेते रमेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

सचिन लांडगे म्हणाले, मनोजदादांचे सामाजिक कार्य हे तळागाळापर्यंत पोचलेले असून त्याची ख्याती इथे पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. असा काम करणारा आमदार आणि जनसामान्यात मिसळणारा नेता आपल्याला मिळावा. मनोज घोरपडे हे खऱ्या अर्थाने कराड उत्तरचा स्वाभिमान आहे.

यावेळी गणेश डांगे, विक्रम चव्हाण, अभ्युत जाधव, शरद पाटील, अनिल घोरपडे, शिवाजी जाधव, विकास शिंदे, सचिन बानुगडे, संदीप बर्गे, अरुण घाडगे, भरत सत्रे, कृष्णा चव्हाण, हनुमंत पिसाळ, राजाराम सावंत, सदाशिव परळकर, वाल्मीक पवार, निलेश शेडगे, महेंद्र बाबर, समाधान थोरात, कांतीलाल भोसले आदी कराड उत्तर मधील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close