कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करा : यशराज देसाई

पाटण | लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये चांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे दुसऱ्या टप्पयातील विस्तारवाढ सुरु असून यंदाचे गळीत हंगामापूर्वी हे काम पूर्ण करत आहोत. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2023-24 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन यशराज देसाई यांनी केले.

दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2023-24 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अशोकराव पाटील, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, बबनराव शिंदे, सुनील पानस्कर, शंकरराव पाटील, विजय सरगडे, सौ. दिपाली पाटील, श्रीमती जयश्री कवर, कार्यकारी संचालक एस. एल. देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चेअरमन यशराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये 2,16,982 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन  सरासरी 12.07 % साखर उताऱ्याने 2,61,790 क्विंटल साखर उत्पादन केले असून, आपण कारखान्याच्या विस्तारवाढीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामास सुरुवात केली असून यंदाच्या गळीत हंगामापूर्वी  दुसऱ्या टप्प्यातील विस्तारवाढीचे  काम पूर्ण होत आहे.तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्याचबरोबर गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही ते म्हणाले. गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील रोलरचे आज पूजन होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker