तांदूळाचा किलोचा दर 80 रुपये निश्चित : कोपर्डे हवेलीत ठराव एकमताने मंजूर
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
भाताचा वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळत नसल्याने इंद्रायणी भात उत्पादक शेतकरी संघ कोपर्डे हवेली व कृषी संगम शेतकरी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुसऱ्या तांदूळ परिषदेमध्ये किलोचा दर 80 रुपये व गुणवत्ता दर्जेचा तांदूळ ग्राहकांना विक्री करण्याच्या ठराव करण्यात आला. यासह अनेक ठराव एकमताने करण्यात आले.
यावेळी सरपंच दत्तात्रय चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, इंद्रायणी तांदूळ निमंत्रक माधव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव चव्हाण, एम. चव्हाण, कृषी अधिकारी डॉ. निलेश थोरात, पी. व्ही. मोरे, कृषी संगमचे संचालक मारुती चव्हाण, संभाजी चव्हाण, शरद चव्हाण, जालिंदर बुधे, बाबुराव चव्हाण, राजेंद्र चव्हाण, विक्रम चव्हाण, अमोल चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, स्वप्निल चव्हाण, राजेंद्र चव्हाण यांच्यासह भात उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
तांदूळ दराबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळेल
कष्टाचे दाम शेतकऱ्यांना मिळत नव्हते. गेल्या वर्षी पहिली तांदूळ परिषद झाली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. दरात एक वाक्यता आल्याने यावर्षीची दुसरीही परिषद यशस्वी झाली. सर्व तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी एकीने चालल्यास तांदूळ दराबाबतीत कष्टानुसार शेतकऱ्यांना न्याय मिळेल.माधव चव्हाण,
निमंत्रक कोपर्डे इंद्रायणी तांदूळ संघ, कोपर्डे हवेली
यावेळी विक्रम चव्हाण यांनी एका किलोचा दर 80 रुपये दराचा ठराव मांडला. मारुती चव्हाण यांनी अनुमोदन दिले. त्याला सर्वानुमते मंजूर देऊन यासह अनेक ठराव सहमत करण्यात आले. सुदाम चव्हाण म्हणाले, कोपर्डे हवेलीची जमिनीची प्रत भाताला पूरक असल्याने तो चवीला असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात आहे. उत्पादन खर्च वाढला असल्यांने दराची वाढ होणे अपेक्षित आहे. माधव चव्हाण म्हणाले, उत्पादन खर्चात वाढ झाली असून आपण गेल्या वर्षापासून तांदळाच्या दर परिषदेचे आयोजन केले आहे. त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे.
बाबुराव चव्हाण म्हणाले, भाताचे उत्पादन चांगले काढल्याने कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनात त्याचा नंबर आला होता. त्या संदर्भात त्यांनी उत्पादन वाढीचे मार्गदर्शन केले.
यावेळी शरद चव्हाण, मारुती चव्हाण, अमोल चव्हाण, स्वप्निल चव्हाण, विठ्ठल चव्हाण, आदीनी चर्चेत सहभाग दर्शवला. डॉ निलेश थोरात यांनी तांदळाचे मार्केटिंग,भाताचे उत्पादन वाढवणे, कोपर्डे हवेली इंद्रायणी नामांकण कसे मिळेल या विषयांवर मार्गदर्शन केले. माधव चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्निल चव्हाण यांनी आभार मानले.
तांदूळ परिषदेत झालेले एकमुखी ठराव.
एक किलोचा दर 80 रूपये.
ग्राहकांना उच्च प्रतीचा व गुणवत्ता दर्जेचा तांदूळ पुरवणे.
भाताचे उत्पादन वाढवण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे.
कोपर्डे हवेली इंद्रायणी नावाने नामांकन मिळवणे.
फाउंडेशन बियाणे तयार करणे.
1 जानेवारी 2024 पासून एक किलो तांदूळ 80
रूपये.
किलोने विक्रीची अंमलबजावणी करायची, अन्य ठराव एक मताने मंजूर करण्यात आले.