kota acadamy karad
आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव : ‘या’ ठिकाणी रूग्ण आढळला

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
कोरोनाने पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून गेल्या दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. मात्र, आता सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.

सन 2020 मध्ये कोरोना संसर्गाने भारतात हाहाकार केला. यावेळी लाॅकडाऊनही करण्यात आल्याने देशावर मोठे संकट आले होते. त्यानंतर कोरोना बाधितांमध्ये चढ- उतार पहायला मिळत आला आहे. अनेकदा प्रशासनाने अनेक नियमावली जाहीर करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून कोरोनाने डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोरोना रूग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनाचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close