कोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारासामाजिक

पृथ्वीराज चव्हाण आक्रमक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीसांचा राजीनामाच मागितला

काॅंग्रेस राज्यभर आंदोलन करणार

कराड ः- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यामातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्दघाटनचा घाट घातला. त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला. महाराष्ट्राच्या अस्मीतेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे त्या विरोधात राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चीत करावी. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरातील दत्त चौक येथे केली.

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्या घटनेच्या विरोधात आज शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर कॉग्रेसतर्फे आंदोलन झाले. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. युवकचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, अल्पसंख्याक आघाडीचे झाकीर पठाण, माजी नगरसेवक अशोक पाटील, विद्याताई थोरवडे, दिग्विजय पाटील, नाना जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुतीच्या सरकारच करायच काय खाली डोकं वर पाय, हटा हटा दो बांधकाम मंत्री हटा दो, भष्ट्राचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाय हाय, भष्ट्राचारी भाजप सरकारचा निषेध असो, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तब्बल तासभर ठिय्या मारून बसले होते. त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी त्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. आमदार चव्हाण म्हणाले, मालवण येथे पुतळा उभारण्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होते. त्या पुतळ्याच्या माध्यमातून भाजपला लोकसभा निवडणूकीआधी इव्हेंट करायचा होता. राज्यातील मते मिळविण्याची खटपट त्यामागे होती. मात्र असे निकृष्ठ काम केल्याने आज त्याचा विपरीत परिणाम दिसतो आहे. त्यामुळे भाजपने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ केल्याचे उघड झाले आहे. छत्रपती हे संबंध हिंदुस्थानचे दैवत आहेत त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध नोंदवित राज्यभर आंदोलन करणार आहोत. आमचे काही सहकारी मालवण येथे परिसराची पाहणी करायला गेले आहेत. ते परतले की, आंदलनाची पुढची दिशा निश्चीत करण्यात येईल. नौदल दिना दिवशीच छत्रपतींचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उभा करण्याची घाई केली गेली. मुळ निवीदेत किती दिवसांचा कालवधी होता. त्या दिवसाआधी काम पूर्ण झाले का, त्यासाठी कसले साहित्य वापरले असें अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचा जाब सरकारला विचारलाच पाहिजे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याने राज्याच्या अस्मितेवर घाला घातला आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने भ्रष्टाचारी सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे.

तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार झाला आहे. वास्तविक नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला गेल्याची आमची माहिती आहे. तो पुतळा नौदलाच्या जागेत असला तरी त्याची जबाबादारी राज्य शासनाकडे आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय करत होते, याचाही खुलासा होण्याची गरज आहे. पुतळा उभारण्याचा कालावधी किती होता, स्ट्रक्चर कुणी आणि का बदलले याचीही माहिती जनतेला देण्याची गरज आहे. या साऱ्या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे. नौदल जबाबदार असेल तर त्याची नैतिक जबाबादारी स्विकारून संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी त्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker