खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराडच्या एस बी मॅरेथाॅनमध्ये महाराष्ट्रासह केरळ, आसामच्या धावपटूचे वर्चस्व

दहा गटात 10 किलोमीटर अतंराची मॅरेथाॅन

कराड – गणेशोत्सवानिमित्त एस बी फाउंडेशन कराड यांच्याकडून आयोजित 10 के मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रासह परराज्यातील आणि दक्षिण आफ्रिका, केनिया या देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या मॅरेथाॅनमध्ये महाराष्ट्रासह केरळ आणि आसामाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. विजेत्यांना तब्बल अडीच लाखांची रोख बक्षीसे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, क्रिडाप्रेमी सुनिल बामणे, संगम उद्योग समुहाचे बाळासाहेब कुलकर्णी, आरटीअो अधिकारी चैतन्य कणसे, अनिल बामणे, विनोदवीर रोहीत चव्हाण, माजी सभापती सुनिल पाटील, इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली.

एस बी मॅरेथाॅन स्पर्धेला सकाळी 6 वाजता सुरूवात झाली. दहा गटात 10 किलोमीटर अतंराची ही मॅरेथाॅन पार पडली. कराड- चिपळूण मार्गावर विजयनगर (एमईसीबी) येथून प्लॅग आॅफ झाल्यानंतर पुढे आरटीअो आॅफिस- सुपने- आबईचीवाडी- वसंतगड- तांबवे फाटा येथून परत विजयनगर (एमईसीबी) या मार्गावर मॅरेथाॅन पार पडली. कराड अर्बन बॅंकेचे सीईअो दिलीप गुरव, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय हरगुडे, युवा उद्योजक सुनिल बामणे, डाॅ. राहूल फासे, डाॅ. अमोल टकले, जाॅर्ज थाॅमस यांच्या हस्ते स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. स्पर्धेचे सुत्रसंचालन वासू पाटील, महेंद्र भोसले, दादासो शिंदे यांनी केले.

 

ग्रामीण भागातही मॅरेथाॅनचे नेटके नियोजन
एस बी फाऊंडेशनकडून आयोजित रन फाॅर ग्रीन कराड, क्लिन कराड नारा देत आयोजित मॅरेथाॅन मुंबई, पुणे, दिल्ली शहरातील धर्तीवर आयोजित करण्यात आली. प्रत्येक धावपटूला टी- शर्ट, टायमिंगसाठी चीफ, एनर्जेल ड्रींक, धावण्याच्या मार्गावर पाण्याची सोय, नाष्ट्यासाठी दही, पिठलं, उसळ आणि चहा ठेवण्यात आला होता. धावपटूला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये फिजोथेरपीही देण्यात येत होती. अनेक मॅरेथाॅनमध्ये बक्षीसांची रक्कम रोख दिली जात नाही. परंतु, कराडच्या एस बी फाऊंडेशनने रोख रक्कम जागेवर दिली. आयोजकांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे धावपटूंनी प्रशंसा केली.

मॅरेथाॅन मधील विजेते व वयोगट पुढीलप्रमाणे ः-  वयोगट 14 ते 18 (पुरूष)- अथर्व शंकर ताटे, साहिल गायकवाड, अजित राठोड, सोहम साळुंखे, अखिलेश वाळूंज.
वयोगट 14 ते 18 (महिला)- मानसी यादव, अदिती हरगुडे, अबोली वास्के, उमेरा सय्यद, क्रांती वेताळ.
वयोगट 18 ते 35 (महिला)- साक्षी जयदाल, श्रृष्ठी रेडेकर, भारती नैन, लेसारगी खिफिलीनाग, सपना पटेल.
वयोगट 18 ते 35 (पुरूष)- रिंकू सिंग, अभिषेक देवकाते, मनिष राजपूत, अभिनंदन सुर्यवंशी, जेनेबे लुले.
वयोगट 35 ते 45 (महिला)- टी. पी. आशा, चंदना कलिथा, स्मिता शिंदे, अलमस मुलाणी, सुजाता माळी.
वयोगट 35 ते 45 (पुरूष)- रमेश गवळी, परशुराम भोई, कृष्णत साठे, सायमन किपलागाट, मल्लिकार्जुन पर्दे.
वयोगट 45 ते 55 (पुरूष) – रणजित खांबरकर, शिवलिंगाप्पा गुठीली, संतू वर्दे, रविंद्र जगदाळे, पांडुरंग पाटील.
वयोगट 45 ते 55 (महिला) – पल्लीव मूग, अनिता पाटील, प्रतिभा नाडकर, बी. एच. वैद्य, सुनिता आरगे.
वयोगट 55 वर्षावरील (पुरूष) – पांडुरंग चाैगुले, अलोक मेहता, केशव मोटे, उदय महाजन, लक्ष्मण यादव.
वयोगट 55 वर्षावरील (महिला) – ज्योती खानिकर, रूपाली दरगड, सुलथा कामथ.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker