Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराड पोलिसांचा गणपती आगमनालाच दणका : लेझर लाईट वाहन आणि 4 डाॅल्बी जप्त

कराड-  कराड पोलिस अॅक्शन मोडवर असून गणेशोत्सावात नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने डीजेला पूर्णत बंदी असून डाॅल्बीवर आवाजाची मर्यादा आहे. गणेश आगमनालाच कराड पोलिसांनी आवाजाची मर्यादा अोलांडणाऱ्या डाॅल्बी ताब्यात घेतल्याच असून त्यासोबत लेझर लाईटवरही कारवाई केली आहे. त्यामुळे डाॅल्बी आणि लेझर मालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कराड येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांनी डीजेला पूर्ण बंदी असून डाॅल्बीवर आवाजाची मर्यादा असल्याचे सांगितले होते. तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होत आहे. या बैठकीला शहरातील तसेच कराड तालुक्यातील अनेक गणेश मंडळे तसेच अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, गणेश आगमानाला काही मंडळांनी डाॅल्बी तसेच लेझर लाईट लावल्या होत्या. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक तैनात केले आहे. या पथकाने कराड शहरात 1 लेझर लाईट लावलेल्या वाहनांवर तसेच 4 डाॅल्बीधारक चालक व मालक यांच्यावर कारवाई केली.

सदरची कारवाई कराडचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार यांनी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close