kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

ब्रिलियंट अकॅडमीचा जिल्ह्यात दणदणीत यशाचा झेंडा; 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

सातारा :- ब्रिलियंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यंदा संस्थेचे एकूण १० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून जिल्हा गुणवत्ता यादीत तसेच राज्य गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले आहे.

जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमध्ये पवार वरद बजरंग (मराठी माध्यम) यांनी जिल्हा गुणवत्ता क्रमांक ३३, पाटील एकता राजेंद्र (इंग्रजी माध्यम) यांनी जिल्हा गुणवत्ता क्रमांक ५०, अक्षरा सचिन मोरे (सीबीएसई) हिने जिल्हा गुणवत्ता क्रमांक २, राज्य गुणवत्ता क्रमांक १६ व तालुका प्रथम क्रमांक, तोरणे उत्कर्ष विकास (एस.सी. प्रवर्ग, मराठी माध्यम) यांनी एस.सी. प्रवर्गात जिल्हा गुणवत्ता क्रमांक २, पोटे आराध्य गवाराम (मराठी माध्यम, ट्रान्सफर सेट-७) यांनी जिल्हा गुणवत्ता क्रमांक ७, स्वरा सचिन कुंभार (मराठी माध्यम) हिने जिल्हा गुणवत्ता क्रमांक ५८, प्रतीक माणिक पाटील (मराठी माध्यम) यांनी जिल्हा गुणवत्ता क्रमांक ९६, चव्हाण प्राची विवेक (इंग्रजी माध्यम) हिने जिल्हा गुणवत्ता क्रमांक १८७, चोथे वेद विजय (इंग्रजी माध्यम) यांनी जिल्हा गुणवत्ता क्रमांक १८९, तर कापरे सार्थक नितीन (मराठी माध्यम) यांनी जिल्हा गुणवत्ता क्रमांक १९८ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या अभूतपूर्व यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम, घाडगे सर, अभिषेक सर व पाटील मॅडम, माने मॅडम यांचे कुशल मार्गदर्शन तसेच ब्रिलियंट टीमचे नियोजनबद्ध अध्यापन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांचे पालक, घाडगे सर, अभिषेक सर व पाटील मॅडम, माने मॅडम आणि ब्रिलियंट टीममधील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून भविष्यातही ब्रिलियंट अकॅडमी अशीच उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close