कृषीताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसाताराहवामान

हवामान खात्याचा इशारा : सातारा जिल्ह्यात 19 ते 21 दरम्यान मुसळधार पाऊस

सातारा। हवामान खात्याने 19 ते 21 जुलै 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्य मानाची शक्यता वर्तवलेली आहे. तेव्हा नागरिकांनी घ्यावयाची काळजी असे आवाहन केले आहे. तर कोयना धरणात गेल्या 9 तासात 1 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. सध्या कोयना धरणात पावसाचा जोर वाढला असून 24 हजार 982 क्युसेस प्रतिसेंकद पाण्याची आवक सुरू आहे.

हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन
🔴पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका व मोबाईलचा वापर करू नका
🔴पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा.
🔴 दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
🔴मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
🔴 नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
🔴जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
🔴नदी- नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
🔴 या कालावधीमध्ये नागरिकांनी शक्यतो पर्यटन स्थळी जाण्याचे टाळावे.
🔴अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका

कोयना धरणात 27 टक्के पाणीसाठी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 9 तासांत कोयनानगर 54 व नवजाला 57 मिलिमीटर व महाबळेश्वरला 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी 2073′ 03″ फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 28.32 टीएमसी झाला आहे.तर धरणात प्रतिसेंकद 24 हजार 982 क्युसेस पाण्याची आवक आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker