क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

धोंडेवाडीत पोहण्यास गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

कराड : पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धोंडेवाडी (ता. कराड) येथे घडली. या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निनाद कुलदीप काकडे (वय १३, रा. धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निनाद काकडे हा पोहण्यासाठी विहिरीत गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शरद चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे धोंडेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close