राज्यातील सरकारची सत्ता गद्दारी, फितुरी आणि पाठीत खंजीर खुपसून : आ. पृथ्वीराज चव्हाण

सातारा । ‘राज्यातील सध्याचे सरकारने गद्दारी, फितुरी करुन आणि पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. राज्यात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला भाजप पक्ष जबाबदार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य महत्वाचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपाचा पराभव निश्चीत असल्याने फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सातारा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, उदयसिंह पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, धनश्री महाडिक, निवास थोरात आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘राज्यातील स्थिती बदलली असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे. त्यातच महाविकास एकत्र लढल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. तर भाजपकडे काही राज्यात नेतृत्वच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपचा पराभव नक्की होणार आहे.