ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे Active रूग्ण शंभरीपार

सातारा | कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात दिवसेंन दिवस वाढ होत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 12 रूग्ण पाॅझिटीव्ह आले आहेत. चालू वर्षभरात पहिल्यांदाच कोरोनाचे सक्रीय रूग्णसंख्या 101 झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

सातारा जिल्ह्यात 2023 सालात आतापर्यंत 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असली तरी रूग्णालयात उपचार घेणाऱ्याच्या संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, भीती बाळगू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 127 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 12 रूग्ण बाधित आढळून आलेत. तर 4 बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पाॅझिटीव्ह रेट हा 9.45 टक्के इतका आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close