Satara पोलीस लेखी परिक्षेबाबत प्रसिध्दीपत्रक जाहीर : 2 एप्रिलला परिक्षा

सातारा | सातारा जिल्हा पोलीस भरती 2021 मधील लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांची – लेखी परीक्षा दि.02/04/2013 रोजी 8.30 ते 10.00 या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे. त्यासोबत राहण्याची तसेच सोबत कोणत्या गोष्टी असाव्यात किंवा नसाव्यात हे सांगण्यात आले आहे.
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा, यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, सातारा व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा या ठिकाणी ही परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी नमुद परीक्षा केंद्रावर 2 (दोन) तास पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षेस येण्यास विलंब झाल्यास कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही, अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांना लेखी परिक्षेकरिता पुन्हा संधी देण्यात येणार नाही. सदर लेखी परीक्षकसाठी महा आयटीकडून प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आलेले policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळा वरून डाउनलोड करून घ्यावे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भुलथापांना व आमिषाला बळी पडू नये. गैरप्रकार करताना कोणी आढळून असल्यास नियंत्रण कक्ष, सातारा यांचे 02162-233833 या क्रमांकावर संपर्क साधावा.
लेखी परिक्षा सुरु झाल्यानंतर ते परिक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवारांस कोणत्याही कारणासाठी परिक्षा केंद्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर जिल्ह्यातून तसेच सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणाचा उमेदवारांची राहण्याची व्यवस्था छत्रपती शाहू क्रीडा संकूल, एस.टी. स्टॅन्ड शेजारी, सातारा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. राहणेबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक, विठ्ठल शेलार गोबाईल क्र. 9923666064 यांचेशी संपर्क साधावा.
उमेदवारांनी लेखी परिक्षेस येताना खालील प्रमाणे कागदपत्रे सोबत घेवून येणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
1. आवेदन अर्जाची प्रत
2. हॉल तिकीट प्रत
3. ओळखपत्राचा पुरावा म्हणून मुळ (आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र ) यापैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे.
4. दोन पासपोर्ट साईज फोटो
उमेदवारांनी सोबत डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक घडयाळ कॅलक्युलेटर, ब्लूटूथ हेडफोन, कॅमेरा असे कोणत्याही प्रकारची साधने सोबत बाळगू नयेत. असे साहित्य आणल्यास वे परिक्षा केंद्रा बाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. जर असे साहित्य लेखी परिक्षेवेळी सोबत बाळगल्याचे निदर्शनास आल्यास अथवा उमेदवार लेखी परिक्षेवेळी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करताना आढळल्यास त्यांना संपूर्ण भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल.