कराड पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवा :- डॉ. अतुल भोसले
विंग जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ

कराड :- सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीवर भाजपचे नेतृत्व आल्यास विकासाला आणखी गती आणण्यासाठी भाजपचा झेंडा फडकवावा. कराड तालुक्यात भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कोळे (ता. कराड) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
भाजपाच्या विंग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. शैलजा शिंदे, कोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्जुन कराळे आणि विंग पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. नंदाताई यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते श्री दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीरंग देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अतुल बाबांना भक्कम पाठबळ देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा.
यावेळी उमेदवार सौ. शैलजा शिंदे, अर्जुन कराळे आणि सौ. नंदाताई यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी घारेवाडी येथील गौरव घारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.



