ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमुंबईराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

शंभूराज देसाई समर्थक आणि ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक भिडले… सोशल वाॅर

पाटण :- राज्यात विधानसभेचा बिगूल वाजला असून सोशल मिडियावर कार्यकर्त्यांकडून विरोधकांची चांगलीच हवा काढण्याचा प्रकार सुरू आहे. पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई- पाटणकर गटात लढत होणार आहे. मात्र, आ. शंभूराज देसाई यांच्या गुलाल आपलाच असेल या पोस्टवरून देसाई समर्थक आणि ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक सोशल वाॅर वर भिडले असल्याचे पहायला मिळत आहे.

गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडून शिंदे शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन गट झाले. शिंदेच्या गटाकडे धनुष्यबाण चिन्ह तर ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाले. पक्षफूटीत आ. शंभूराज देसाई यांची महत्वपूर्ण भूमिका होती. या भूमिकेमुळे उध्दव ठाकरे यांच्यासोबत असलेला कट्टर शिवसैनिक पाटण विधानसभा मतदार संघात आ. देसाईंच्या विरोधात असणार हे आता स्पष्ट होवू लागले आहे. आ. देसाईंनी विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सज्ज व्हा, गुलाल आपलाच असेल अशी सोशल मिडियावर पोस्ट टाकली आहे. यावर आता मशालीचे शिवसैनिक व्यक्त होत असून तिखट प्रतिक्रिया देताना पहायला मिळत आहेत.

Shambhuraj Desai and Thackeray Shiv Sena

 

पाटण मतदार संघातील विजय हा अगदी काठावर लागलेला अनेक काळचा इतिहास आहे. तसेच मंत्रीपद असताना पराभव होतो, हाही इतिहास आहे. आ. शंभूराज देसाई यांच्या समर्थकांकडून कोट्यावधीच्या विकासकामांचा दावा केला जात आहे. तर विरोधी पाटणकर तसेच ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून गद्दारी आणि टक्केवारीसह भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. निवडणुकीच्या धामधुमीमुळे आता सोशल मिडियावर सोशल वाॅर चांगलेच तापले आहे. देसाई समर्थक विरूध्द ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक सोशल मिडियावर भिडल्याचे पहायला मिळत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker