शरद पवारांची पत्रकार परिषद ः उदयनराजेंची स्टाईल मारत काॅलर उडवली

सातारा प्रतिनिधी वैभव बोडके
साताऱ्यात शरद पवारांनी आज बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा उमेदवारीबाबत निर्णय केव्हा होईल, तसेच कोणकोणाची नावे चर्चेत आहेत, हेही वाचून दाखवले. तसेच स्वतः साताऱ्यातून लढण्यावर स्पष्टपणे सांगितले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माघारीचे कारणही सांगितले. तर शेवटी महादेव जानकरांच्या पलटीवरही प्रतिक्रिया देत खा. उदयनराजेंची स्टाईल मारत काॅलर उडवली.
खा. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
राष्ट्रवादी दोन दिवसात सातारा लोकसभेचा निर्णय जाहीर करेल. श्रीनिवास पाटील होते तोपर्यंत आमच्यापुढे काही अडचणी नव्हत्या.
साताऱ्यातून मी लढावं हे डोक्यातून काढा, मला राज्याबाहेर- राज्यात प्रचाराला जाव लागणार आहे
खासदार श्रीनिवास पाटील यांच्यानंतर शरद पवार यांच्याकडूनही साताऱ्यातून लढण्यास नकार
आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर आणि श्रीनिवास पाटील चर्चेतील नावे शरद पवारांनी वाचून दाखवली.
आमची विचारधारा यशवंतराव चव्हाणांची असून त्याच्या विचाराने आम्ही काम करत आहोत.
श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतीच्या कारणामुळे नकार दिला असून निवडणूकीचा संघर्ष सहन करण्याची परिस्थिती सध्या श्रीनिवास पाटलांची नसल्याचे शरद पवारांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात येणार होती, परंतु, ते परत महायुतीत गेले त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आमची इच्छा अशी होती की माढ्याची जागा धनगर समाजाला द्यावी. त्यासाठी ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्याच्याशी आमचा निर्णय झाला होता. नंतर काय झालं माहिती नाही. या निवडणुकीत मतदार पळवतात परंतु, आता उमेदवारही पळवतानाही दिसत आहे.
शरद पवारांनी काॅलर उडवली,
छ. उदयनराजे यांना पुन्हा राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणार का यावर अजिबात नाही, म्हणत काॅलर उडवली.
वंचितने आमच्या बरोबर याव, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
सातारा लोकसभा राष्ट्रवादी काॅंग्रेसची जागा असून इथे राष्ट्रवादीचाच उमेदवार येईल, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जागा सोडली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेलांना सीबीआयने क्लिनचीट दिली, यावर शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला. ते म्हणाले, देणारच. त्यासंबधी आमच्या बरोबर होते, तेव्हा ते चिंतेत होते. जेलमध्ये जायच्या ऐवजी भाजपमध्ये गेलेलं बरं.



