गोळीबार प्रकरण : कदम कुटुंबाला मारहाण करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा, बारा बोअर बंदुक जप्त
पाटण | मोरणा खोऱ्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या मदन कदम याच्यासह त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी 10 जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मदन कदम याचा मुलगा गौरव याने फिर्याद दिली आहे. श्रीरंग जाधव यांच्यासह अनोळखी नऊजणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. तर पोलिसांनी ज्या बंदुकीतून फायरिंग झाले ती बारा बोअरची बंदुक पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, कारची काच फोडल्याचा राग मनात धरून रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग जाधव यांच्यासह दहाजण घराच्या कंपाउंडमधून आत घुसले. त्यांनी वडील मदन कदम, भाऊ योगेश कदम व मला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे गौरव कदम याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करीत आहेत.
गोळीबार झालेली परवानाधारक बंदुक
ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने ज्या बंदुकीतून गोळीबार केला, ती बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. त्याने झाडलेल्या गोळ्यांपैकी तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत यांना लागल्याचे समोर आले आहे. याव्यतिरीक्त कदमने आणखी किती गोळ्या हवेत झाडल्या, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. कदम याने बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला. तसेच ज्या बारा बोअरच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्या बंदुकीचा परवाना असल्याचेही तपासातून समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मदन कदमने झाडलेल्या तीन गोळ्या श्रीरंग जाधव व सतीश सावंत या दोघांना लागल्या आहेत. घटनास्थळावर पोलिसांना फक्त दोन पुंगळ्या आढळल्या आहेत. मात्र, त्याने हवेत आणखी गोळ्या झाडल्या असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस त्यादृष्टीनेही तपास करतायत. मदन याने हवेत किती गोळ्या झाडल्या, याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगीतले.