पाटणकर गटाला धक्का : घोट विकास सोसायटीत 26 वर्षांनी सत्तांतर, देसाई गटाचा झेंडा

– विशाल वामनराव पाटील
पाटण तालुक्यातील घोट विकास सेवा सोसायटीचा पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल 26 वर्षांनी राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला धक्का देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्ता काबीज केली. गेली 19 महिने उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ झालेल्या घोट विकास सेवा सोसायटीचा पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. त्यामध्ये देसाई गटाने सर्वच्या सर्व 13- 0 असा एकहाती विजय मिळवला आहे. घोट सोसायटीच्या विजयी उमेदवाराचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन व युवानेते यशराज देसाई व तारळे विभाग पदाधिकारी कमिटीच्या सर्व मान्यवर यांनी अभिनंदन केले.
श्री स्वयंभू महादेव शेतकरी विकास पॅनल विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः-
सर्वसाधारण गटातून- श्रीरंग विठ्ठल आरेकर, विजय तुकाराम डफळे, आनंदराव एकनाथ शिंदे, जालिंदर धोंडीबा शिंदे, सुरेश शंकर शिंदे, रघुनाथ मारुती सावंत, रामचंद्र पांडुरंग सावंत, सुरेश शंकर साळुंखे. महिला राखीव गटातून- सुवर्णा राजेंद्र शिंदे, सुनंदा जगन्नाथ सावंत. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून – महिपती मुरा सोनावले. वि. ज/ भ. ज/ विमा प्रवर्गातून- भागोची जगन्नाथ वरक. इतर मागास प्रवर्गातून- विनोद राजाराम सोनटक्के.
पॅनल निवडून आणण्यासाठी बजार समितीचे संचालक नामदेवराव साळुंखे, शिव दोलत बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी सरपंच मधुकर आरेकर, शिवसेना तालुका उपप्रमुख भानुदास शिंदे, घोट सोसायटीचे माजी चेरमन दशरथ शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते रवी बोर्गे, प्रल्हाद सोनवले, पांडुरंग सोनवले, संपत सावंत आनंदा बोर्गे, महादेव सावंत, बाळासाहेब सावंत, हणमंत सावंत, राजेंद्र शिंदे, भगवान पोसूगडे, तानाजी शिंदे, शंकर चव्हाण, पिंटू शिंदे, दत्ता पाटील, उपसरपंच सौ. सुरेखा सोनवले, ग्रामपंचायत सदस्य संभाजी सावंत, रामचंद्र शेजवळ, किसन साळुंखे, सोपान नाडेकर, ज्ञानदेव घोरपडे, दादा कांबळे, संजय आरेकर, धनाजी शिंदे, शामराव सावंत, दत्ता पाटील, पिंटू शिंदे, श्रीधर सोनटक्के व तारळे भाग कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी व घोट पंच क्रोशीतील सर्व कार्यकर्ते यांनी पॅनल विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.



