पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा ‘रयत स्वाभिमानी’ तर्फे सत्कार
सातारा | पुसेसावळी (ता. खटाव) संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष कल्पकता, कौशल्य दाखवून सुरळीत उपाययोजना राबवण्यात यशस्वी ठरल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा विशेष कृतज्ञता सत्कार स्वाभिमानी संघटनेतर्फे करण्यात आला.
रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशील कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुमित साळुंखे, सचिव अभय जाधव, सरचिटणीस निहाल इनामदार, तालुकाध्यक्ष तेजस काकडे, माथाडी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा सन्मान केला.
पुसेसावळीतील घटना अत्यंत दुर्दैवी असली तरी पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला. दूरदृष्टीने केलेल्या नियोजनामुळे जिल्ह्याच्या लौकिकाला बाधा आली नाही, असे आदर्श अधिकारी हे जिल्ह्याचे भूषण आहेत, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष सागर पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.