kota acadamy karad
अकोलाताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराडहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. अमोल मिटकरींना पाठवले ‘निरमा पावडर आणि दूध’

कराड | आमदार अमोल मिटकरी हे आमदार रोहित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत असल्याने रोहित पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव समीर कुडची यांनी अमोल मिटकरी यांचा समाचार घेतलाय. अमोल मिटकरी यांची पवारांवर बोलण्याची लायकी नसल्याचे सांगत त्यांनी अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील घरी निरमा पावडर आणि दुध कुरीयरने पाठवत असल्याचे सांगितले. तसेच या निरमा पावडर आणि दुधाने मिटकरी यांनी स्वताचे चारीत्र स्वच्छ करून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

कराड येथे माध्यमांशी समीर कुडची बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आ. अमोल मिटकरी हे शरद पवार यांच्यामुळे आमदार झाले आहेत. अगोदर ते इकडेतिकडे भाषणे देत फिरत होते, त्यांना पवारांच्या कृपेने आमदाराकी मिळाली. आता त्याच्याच नातवांवर ते बोलत आहेत. तेव्हा आम्हांला एवढेच सांगायचे आहे, त्यांनी स्वतःच चारित्र्य स्वच्छ करून घ्यावे.

आ. अमोल मिटकरी यांचा राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून निषेध
आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने आ. रोहित पवार यांच्यावर बोलत आहेत. तेव्हा त्यांचे चारित्र्य आणि पाप धुण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून निरमा पावडर आणि दूधाची पिशवी कुरियर करण्यात आली. अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील घरच्या पत्यावर पावडर आणि दूध पाठवत अनोख्या पध्दतीने आमदार रोहित पवार यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close