Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

साताऱ्यात पुन्हा कोयत्याचा थरार : मारेकरी फरार

सातारा | साताऱ्यात पुन्हा कोयत्याचा थरार पहायला मिळाला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आसलेल्या पाटील वडापाव येथे दोन गटाकडून कोयते नाचविण्यात आले. दोन गटातील या राड्यामुळे सातारकरांच्यात खळबळ उडाली. या घटनेत दोनजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील गुरुवार परज आणि पोलीस स्टेशन नजीक असलेल्या पाटील वडापाव येथे दोन गट सायंकाळी उशिरा भिडले. धारधार शस्त्रांचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

दोन गट भिडल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या मारामारीच्या घटनेत 2 जण जखमी असून संशयित मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी जवळच असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यास सुरूवात केली असून मारेकऱ्यांना लवकरच पकडले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close