लायन क्लब कराड सिटीचा पदग्रहण : अध्यक्षपदी संदीप कोलते तर सचिवपदी मंजिरी खुस्पे

कराड | विशाल वामनराव पाटील
लायन्स क्लब कराड सिटीचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात हॉटेल पंकज येथे शनिवारी संपन्न झाला. लायन्स क्लब कराड सिटीच्या नूतन अध्यक्षपदी लायन संदीप कोलते, सचिवपदी लायन सौ. मंजिरी खुस्पे व खजिनदार पदी लायन सौ. मीना कोलते यांनी यावर्षीचा पदभार स्वीकारला. तसेच संचालक मंडळाचा ही पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला. यावर्षी क्लबमध्ये 8 सदस्यांची नव्याने वाढ झाली आहे.
या कार्यक्रमास पदप्रधान अधिकारी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहित यांनी शपथविधी देऊन पदग्रहण प्रदान केला. तसेच द्वितीय उपप्रांतपाल एमजेएएफ लायन वीरेंद्रजी चिखले यांनी क्लब मध्ये आलेल्या नवीन 8 सदस्यांना शपथविधी प्रदान केला. या समारंभाला प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल एमजेएफ लायन एम. के. पाटील सर तसेच रीजन चेअरमन एमजेएफ लायन बाळासाहेब शिरकांडे, एल सी आय एफ कॉर्डिनेटर लायन डॉ. महेश खुस्पे, झोन चेअरमन लायन सुशांत व्हावळ, माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर व रीजन मधील सर्व पदाधिकारी व लायन्स क्लब कराड सिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मागील वर्षीच्या अध्यक्षा लायन सोफिया कागदी, सेक्रेटरी लायन शर्मिष्ठा गरुड , खजिनदार लायन सुनीता पाटील यांनी नवीन अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार यांच्याकडे नवीन वर्षाची सूत्रे सुपूर्द केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन मैथिली खुस्पे व लायन निईम कागदी यांनी केले.लायन क्लबच्या कार्यक्रमात ज्या लायननी बहुमोल सहकार्य केले, त्यांचा गाैरव मावळत्या कमिटीने यथोचित सत्कार केला.
क्लबचे नूतन अध्यक्ष संदीप कोलते म्हणाले, आगामी काळात माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती क्लबच्या ध्येयधोरणानुसार पार पाडेन. तसेच सर्वांसोबत कराड सिटी लायन क्लब एक उत्तुंग शिखरावर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मावळत्या अध्यक्ष व सर्व लायन यांच्यासोबत एकत्रित काम केले जाईल. लायन क्लब समाजातील ज्या 9 सूत्रांवर चालत आहे, त्याचे तंतोतंत पालन केले जाईल.