क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

टाटा नेक्सनच्या धडकेत फॉर्च्यूनर हायवेवरून उडाली अन्…

कराडजवळ महामार्गावर अपघात

कराड :- पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर खोडशी नजीक थांबलेल्या फॉर्च्यूनरला पाठीमागून वेगात आलेल्या टाटा नेक्सनने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की या धडकेमुळे फॉर्च्यूनर हायवे वरून उडून सर्विस रस्त्यावर पडली. विशेष म्हणजे या अपघातात गाडीमधील लोक किरकोळ जखमी झाले आहेत.

दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कदम क्रेनचे राहुल कदम, सुनील कदम, शुभम शिंदे, डीपी जैन कंपनीचे पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा, ॲम्बुलन्सचे प्रफुल्ल बाबर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघात जोराचा होऊनही या अपघातात गाडीतील बचावले असून त्यांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close