शिद्रुूकवाडीत गोळीबारात दोघे ठार तर 1 जखमी : शिवसेनेचा नेता ताब्यात
पाटण | पाटण तालुक्यातील मोरणा विभागात गुरेघर परिसरात रविवारी रात्री 9 च्या सुमारास ठाणे जिल्ह्याचे माजी नगरसेवक मदन कदम (मल्हारपेठ) याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण जखमी झाला आहे. यामुळे पाटण तालुक्यात मोरणा गुरेघर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.दरम्यान मदन कदम याला पाटण पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाटण तालुक्यातील गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मदन कदम याने गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग जाधव (वय ४५), सतिश सावंत (३०) हे 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर प्रकाश जाधव (४२) हे जखमी झाले असूनत्यांना अधिक उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. दरम्यान सातारा जिल्याचे पोलीस प्रमुख समीर शेख, सहाय्यक एसपी बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलिस निरीक्षक विकास पाडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान 2 ही मृतदेह ऑन कॅमेरा शवविच्छेदनासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांची पाटण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.