कराड येथील कोटा अकॅडमीच्या उत्कर्ष पाटीलला दिड कोटीचे पॅकेज
कराड :- आयआयटी – जेईई ची तयारी करून घेणाऱ्या कराड येथील सुप्रसिद्ध कोटा अकॅडमीच्या उत्कर्ष राजाराम पाटील या विद्यार्थ्याची नुकतीच अमेरिका स्थित लुब्रीझॉल या कंपनीत रिसर्च सायंटिस्ट म्हणून निवड झाली. लुब्रीझॉल कंपनीने त्याला दीड कोटी रुपायांचे आर्थिक पॅकेज दिले आहे .

कराड येथील कोटा अकॅडमी मध्ये त्याने इयत्ता 11 वि व बारावीसह आयआयटी ची तयारी केली होती. आयआयटी जेईई मध्ये सिलेक्ट झाल्यावर आयआयटी जेईईच्या मार्कवर त्याला मुंबईतील जगप्रसिद्ध अश्या आयसीटी या कॉलेजमध्ये बीटेक ला प्रवेश मिळाला. तेथे चार वर्ष फायबर टेक्नॉलॉजी या विषयात गोल्ड मेडल मिळवून त्याने अमेरिकेत ओहियो विद्यापीठात दरमहा अडीच लाख शिष्यवृत्ती मिळवून पीएचडी पूर्ण केली.
कडेगाव तालुक्यातील सोनकिरे हे त्याचे गाव व कराड तालुक्यातील शेणोली हे त्याचे आजोळ . ग्रामीण भागातील असून त्याने हे यश संपादन केले. त्याच्या या यशाच्या वाट्यात कोटा अकॅडमी व कोटा अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे सरांचा मोलाचा वाटा आहे असे उत्कर्षचे वडील राजाराम पाटील यांनी सांगितले. बारावी बोर्डाच्या परीक्षेत देखील तो संपूर्ण तालुक्यातून प्रथम आला होता . तसेच त्याला इन्स्पायर अवॉर्ड व स्कॉलरशिप हि मिळाली होती . त्याला मिळालेल्या या स्पृहणीय यशाबद्दल कोटा अकॅडमीचे प्रमुख डॉ महेश खुस्पे, सौ. मंजिरी खुस्पे व मैथिली खुस्पे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे . ग्रामीण भागातील असून त्याने हे यश संपादन केल्याबद्दल उत्कर्ष पाटील याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .



