बाबाजी पाटील पतसंस्थेतर्फे वाहन वितरण

मलकापूर :- कराड तालुक्यातील मलकापूर येथील बाबाजी पाटील पतसंस्थेतर्फे अभिजित डाके यांना मारूती ईरटीका या वाहनाचे वितरण संस्थापक आप्पासो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गाडीचे पुजन संचालक महेश बोरगांवकर यांनी केले. यावेळी सचिव अस्लम मुल्ला, संचालक विजय देशमुख, अवधुत पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आप्पासो पाटील म्हणाले, कै. अंकुशराव पाटील यांच्या विचारावर मार्गक्रमण करत संस्था गरजू सामान्य व्यक्तींना कर्जरूपी अर्थसहाय्य करून त्याची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थेकडे 5 कोटी 10 लाख ठेवी असून 3 कोटी 60 लाख कर्ज वाटप केले आहे. संस्थेस स्थापनेपासून ऑडीट वर्ग ‘अ’ आहे. तसेच संस्थेची स्वमालकीची इमारत आहे. सभासदांना सतत लांभाश देणारी आणि सभासदांचा’ विश्वास संपादन करणारी कराड तालुक्यातील एक आर्दश संस्था म्हणून नावारूपास आली आहे. संस्थेने मागील आर्थिक वर्षात 9 कोटीचा व्यवसाय केला असून लवकरच संस्थेची पहिली शाखा कोयनावसाहत येथे सुरू करून खातेदारांना सी. बी. एस. संगणकीय सेवा देणार आहे.
या वाहन वितरण प्रसंगी संचालक अंकुश पवार, बापूराव नलवडे, दिपक लावंड, सौ. मिनाक्षी कचरे, सभासद जमीर शिकलगार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिव अस्लम मुल्ला यांनी केले. आभार संचालक विजय देशमुख यांनी मानले.