Video : मोदीचा पुणे दाैरा अन् चर्चेतील ‘ती’ कविता, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
हॅलो न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं गौरविण्यात आले असताना सध्या एक कविता चर्चेत आलेली आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का… असा सवाल सरकारला या कवितेच्या माध्यमातून विचारला गेला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली असली तरी त्याच्याच एका खासदाराने ही कविता केलेली आहे.
सध्या सोशल मीडियावर या कवितेने चांगलेच लक्ष वेधून घेतलेले दिसत आहे. त्यात त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय…असा परखड सवाल विचारत वेगळ्याच चर्चेला सुरुवात करुन दिली आहे. मोदींचा पुण्यात गौरव होत असताना त्या पार्श्वभूमीवर या कवितेतून अभिनेता असलेल्या या खासदाराने आपली रोखठोक प्रतिक्रिया त्या कवितेच्या माध्यमातून मांडली आहे. या कवितेत पगडी, मालक, स्वातंत्र्य अन् लोकमान्य टिळक यांचे कार्यांचा आढावा घेतला गेला आहे. मात्र, सरकारला अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलेच धारेवर धरले आहे.
मोदी यांची पुणे भेट, त्यांना लोकमान्य टिळक यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं गौरविले जाणे याला बाकीच्या गोष्टींचा संदर्भ देण्याचा प्रयत्न डॉ.कोल्हे यांनी या कवितेच्या माध्यमातून केल्याचे दिसून येत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या कवितेवर आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. नेटकऱ्यांनी कोल्हे यांचे कौतूक केले आहे. त्यांनी ज्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत त्याला पाठींबा दर्शवला आहे.