ताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

ओझर्डे धबधबा परिसरात रानगव्याचा तलाठ्यावर हल्ला

दुचाकीवरून जाताना दोन गव्याचा हल्ला

कराड :- साताऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या ओझर्डे धबधबा परिसरात रानगव्याने तलाठ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून पाटण तालुक्यातील नवजा येथील अजय जाधव हे तलाठी गंभीर जखमी झाले आहेत.

तलाठी अजय जाधव हे शासकीय कामकाज उरकून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी जात होते. ओझर्डे धबधबा परिसरात अचानक एक रानगवा दुचाकी गाडीसमोर आडवा आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ मोटारसायकल थांबवली.
याच दरम्यान झुडपातून दुसरा रानगवा अचानक बाहेर येत त्यांच्यावर पाठीमागून जोरदार हल्ला केला. या धडकेत ते मोटारसायकलवरून खाली पडले असून पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close