ताज्या बातम्यादेशपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

लेह- लडाखमध्ये सातारा जिल्ह्याचा सुपुत्र शहीद : मंगळवारी पार्थिव गावी येणार

फलटण| काल सायंकाळी उशिरा लडाखच्या लेहमध्ये एक अतिशय दुर्देवी घटना घडली आहे. भारतीय सैन्याचं एक वाहन दरीत कोसळलं आहे. या अपघातात तब्बल 9 जवान शहीद झाले असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका जवानाचा समावेश आहे. राजाळे (ता. फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे हा 30 वर्षे जवान शहीद झाला आहे. या घटनेमुळे फलटण तालुका शोकसागरात बुडाला आहे.

लेहमध्ये भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. लेहजवळील क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचा ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.

फलटण तालुक्यातील वैभव भोईटे हे या अपघातात शहीद झाले असून त्यांना एक दीड वर्षाची मुलगी आहे. तर त्यांच्या पत्नी या दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. वैभव भोईटे यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. वैभव भोईटे यांचे माध्यमिक शिक्षण जानाई हायस्कूल राजाळे येथे तर पुढील शिक्षण मुधोजी कॉलेज फलटण येथे झाले आहे. शहीद जवान वैभव यांचे पार्थिव मंगळवारी गावी येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close