कृषीकोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराज्यविदर्भ

मान्सून आला ! महाराष्ट्रात दक्षिण कोकणात आणि मध्य गोव्यात पाऊसाची एंन्ट्री

हॅलो न्यूज। शेतकऱ्यांना दिलासा व उकाड्यापासून सुटका करणारी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून लांबणीवर पडलेला मान्सूनचा पाऊस दक्षिण कोकणात, मध्य गोव्यात दाखल झाल्याचे हमावान खात्याने सांगितले आहे. पश्चिम दिशेने वाहणारे वारे आणि पाऊस यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे.

Kota Academy Karad

सध्या कर्नाटक, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूत मान्सून दाखल झाला आहे. बिपरजाॅय चक्रीवादळ आरबी समुद्रात जस- जसे वर सरकत आहे. तस- तसा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग महाराष्ट्राला चांगला मिळत आहे. पुढील दोन दिवसात चक्री वादळ वरती सरकेल आणि 13, 14 ताखरेनंतर मान्सून दाखल झालेला दिसेल.

गेल्या 3- 4 दिवसापासून मान्सूनचा जोर पश्चिम किनारपट्टीवर आहे, तसा पूर्व किनारपट्टीवर दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अजून 8 दिवसाची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे आता मान्सून दाखल झाल्याने पेरणीसह अन्य शेतीच्या कामांना शेतकरी वर्ग शेतात दिसू लागणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close