कोल्हापूरक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारा

Satara : प्रवाशी उतरले नाश्त्यासाठी अन् ट्रॅव्हल्समधून 25 किलो चांदी चोरीला

वाई | पुणे- बंगळूर महामार्गावर वाई तालुक्यातील भुईंज- जोशीविहीर दरम्यान एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेल्या खासगी ट्रॅव्हल्समधून 11 लाख 64 हजार रुपये किमतीची 25 किलो चांदीचे दागिने ठेवलेली सॅक अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सकाळ- सकाळी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय रघुनाथ चोपडे (रा. तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे कोंडुसकर कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून 25 किलो चांदीचे दागिने घेऊन पुण्याला जावयाकडे निघालेले होते. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास ट्रॅव्हल्स नाश्त्यासाठी थांबलेली होती. विजय चोपडे हे सुद्धा नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते, त्यावेळी त्यांनी चांदी ठेवलेली काळ्या रंगाची सॅक बसलेल्या खुर्ची शेजारीच ठेवली होती. प्रवाशांसोबत नाष्टा करून परत ट्रॅव्हल्समध्ये श्री. चोपडे आले, तेव्हा त्यांना सॅक आढळून आली नाही. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांनी चौकशी केली. सॅकचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.

सॅकमध्ये तब्बल 25 किलो चांदीचे लहान मुलांचे व महिलांचे पैंजण दागिने होते. याची किंमत 11 लाख 64 हजार आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झालेली असून, पुढील तपास सहायक उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker