क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा
खटाव तालुक्यात 28 वर्षीय युवकाची राहत्या घरात आत्महत्या

पुसेसावळी । खटाव तालुक्यातील चोराडे येथील अठ्ठावीस वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. महेश शिवाजी मदने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अक्षय शिवाजी मदने यांनी औंध पोलीस ठाणेस दिली आहे.
याबाबत औंध पोलीसांनी दिलेली माहिती अशी, दि.18 जून 2023 रोजी, सकाळी 07.00 वा.चे सुमारास मौजे चोराडे (ता.खटाव) येथे राहते घरात महेश शिवाजी मदने याने लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याने तो मयत झालेला आहे. तरी अधिक तपास पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्राचे पो. हवा. राहुल सरतापे करीत आहेत.
महेश मदने यांने आत्महत्या का केली यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आत्महत्येचे कारण काय यांचा तपास पोलिस करत आहेत. महेश यांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.