कराड सोलर ऊर्जा
खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यशैक्षणिकसातारा

मोरणा शिक्षण संस्थेचे यश : कुस्तीत अनिष शिर्केला सुवर्णपदक तर वैभव घोणेंना आदर्श शिक्षक पुरस्कार

पाटण (हॅलो न्यूज) :- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित, श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, दौलतनगर या महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. अनिष राजाराम शिर्के या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे या विद्यालयातील उपक्रमशील क्रीडा शिक्षक वैभव घोणे यांना यावर्षीचा अविष्कार फौंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने गाैरविण्यात आले.

वैभव घोणे यांच्या सन्मानास प्रमुख पाहुण्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सौ.प्रिया शिंदे, सातारा जिल्हा परिषद सदस्या सौ.वृषाली चव्हाण, आविष्कार फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, शिवप्रेमी मनोहर यादव आदी उपस्थित होते. वैभव घोणे यांनी मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयामध्ये गेली 21 वर्षे डीएड शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अध्यापनाबरोबरच अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा, राज्य स्तरावर पोहचविले आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वैभव घोणे आणि अनिष शिर्के यांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, युवा नेते ॲड.जयराज देसाई, आदित्यराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास कुराडे, संस्थेचे सचिव डी.एम. शेजवळ व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य ए. टी. शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. कुंभार सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close