ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराजकियराज्यसातारासामाजिकसोलापूर

92 नाय 96 नाय सगळा मराठा सरसकट एक : आ. शहाजी बापू पाटील

पुणे | 92 नाय 96 नाय 87 अन् 88 नाय सगळा मराठा सरसकट एक आहे. यामध्ये कोणताही भेदभाव करू नका. जुन्या परंपरा होत्या. कोणी उच्च, कुणी खाली, कोणी वर आता सगळं संपलेलं आहे. आता मराठा समाजाची भयावह परिस्थिती असून सरकारने काहीही करून आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी शिंदे शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सांगोल्याचे आ. शहाजी बापू पाटील माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आता जपानचं पोरग अमेरिकेची पोरगी करायला लागलं. आपली पोरगी अमेरिकेला लग्नाला निघून जायला लागली आहे. मराठा समाजाचे उपजीविकेचे साधन जमीन होतं आणि चाळीस वर्ष पाठीमागे किंवा शिवकालीन काळात तेव्हा ज्याच्याकडे जमीन जास्त तो गावातील सर्वात श्रीमंत माणूस गणला गेलेला होता. परंतु आज कोणत्याही मराठ्याला दोन- अडीच एकराच्या वरती जमीन नाही‌. त्यामुळे भयावह परिस्थिती आहे. तेव्हा सरकारने काही करून आरक्षण दिलं पाहिजे. या भूमिकेचा मी आहे, मनोज जारंगे पाटील यांना मी मागच जाहीर पाठिंबा आहे.

अजित दादा आमचे नेते : आ. शहाजी बापू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण प्रश्न सोडवतील. यासाठी त्यांनी मैदानात उतरणे गरजेचे नाही. त्यांनी दिल्ली, मुंबई, मंत्रालय या ठिकाणी बसून हा प्रश्न सोडवला पाहिजे. यावेळी माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करताच, अजित दादा आमचे नेते आहेत, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी प्रश्न टाळला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker