kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

कराडजवळ गोवा बनावट दारूसह ट्रक, चारचाकीसह तिघे ताब्यात : कारवाईत 82 लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड | नारायणवाडी (ता. कराड) गावचे हद्दीत अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कराड राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पकडले आहे. या कारवाईत एक ट्रक, एक चारचाकी आणि 4 मोबाईल असा 82 लाख 6 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, रत्नागिरीहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये क्रमांक (एमएच- 50-एन- 7337) गोवा बनावट विदेशी दारु 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 11, 088 सिलबंद बाटल्या, 750 मि.ली 948 सिलबंद बाटल्या, बिअरचे 500 मि.लीचे 2400 कॅन तसेच एक चौदा चाकी मालवाहू ट्रक, पायलटींग करिता वापरलेले एक चारचाकी वाहन, गुन्ह्यातील अवैद्य मद्यसाठा लपविण्या करिता वापलेल्या भुश्याच्या 45 गोण्या, 4 मोबाईल संच असा एकुण 82,05,880/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामजी चंद्रकांत होनमाने आणि मुस्ताक मुबारक नदाफ (दोघेही रा. जयभवानीगर, आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली) यांच्यासह अन्य एकजण या तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्तसो डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क सातारा अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक शरद नरळे, सहा. दु. निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सचिन खाडे, अजित रसाळ, भिमराव माळी, सचिन जाधव, श्रीमती मुनिजा मुल्ला यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संजय साळवे हे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close