कृषीकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भसांगलीसाताराहवामान

रासायनिक शेतीच्या विळख्यातून मुक्तीसाठी प्राकृतिक शेतीच ठरणार संजीवनी : रामकृष्ण वेताळ

ओगलेवाडी : भाजपा किसान मोर्चा, सातारा जिल्ह्याच्या वतीने करवडी येथे आयोजित प्राकृतिक शेती कार्यशाळेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह कृषी तज्ज्ञ विजय वरुडकर, जगन्नाथ मगर, शशिकांत क्षीरसागर, खुशलचंद मोरे, डॉ. भरत खांडेकर, डॉ. दिलीप धोंगडे आणि डॉ. विशाल महाजन यांनी शेतकऱ्यांना आधुनिक व प्राकृतिक शेतीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी प्राकृतिक शेतीचा स्वीकार हाच भविष्यातील प्रभावी पर्याय असल्याचा सूर यावेळी सर्वच मान्यवरांच्या मार्गदर्शनातून उमटला.

यावेळी रामकृष्ण वेताळ म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना निसर्गाशी असलेले नाते जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावत असून अन्नसाखळीत विष मिसळले जात आहे. त्यामुळे विविध गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. कमी खर्च, अधिक उत्पादन आणि आरोग्यदायी अन्नासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्राकृतिक शेतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.” त्यांनी नैसर्गिक बियाण्यांच्या संवर्धनासाठी बीज बँक उभारणीचीही गरज अधोरेखित केली.

कृषी तज्ज्ञ विजय वरुडकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती देत एल-निनोचा शेतीवर होणारा परिणाम, बदलत्या हवामानानुसार पीक नियोजन, रोग-कीड व्यवस्थापन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, महिलांची शेतीतील भूमिका तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मोबाईल अॅप्स याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अन्य तज्ज्ञांनीही विविध कृषी विषयांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

भाजपा किसान मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेस संजय घोरपडे, शंकरराव शेजवळ, विकास गायकवाड, नवीन जगदाळे, जयसिंग डांगे, नम्रता कुलकर्णी, प्रशांत भोसले, बाळासाहेब पोळ, रुक्मिणी जाधव, उषाताई नलवडे, रामराव भोसले, अश्विनी पळसे, शशिकांत डुबल, संजय पिसाळ, संजय घार्गे, सचिन नांगरे, राहुल यादव, दीपक इंगवले, शहाजी मोहिते, रघुनाथ शेडगे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्राकृतिक शेतीपासून मिळणारे प्रमुख फायदे
1) जमिनीची सुपीकता वाढते
2) उत्पादन खर्चात बचत होते
3)विषमुक्त व दर्जेदार अन्नधान्य
4) पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन 5)हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता.
6) शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close