शेतकऱ्यांना कर्जमाफीचा ऐतिहासिक दिलासा : रामकृष्ण वेताळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन

कराड :- भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी आज त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारा ठराव जाहीर करत हा निर्णय राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना नवसंजीवनी देणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करणार असल्याचे सांगितले.
शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि अडीअडचणी ओळखून घेतलेला हा निर्णय राज्याच्या कृषी विकासाच्या दृष्टीने महिलाचा दगड ठरेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. श्री वेताळ पुढे म्हणाले शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील सातत्याने होणारी वाढ, दुष्काळ, बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कर्जमाफीचा निर्णय घेतला हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या नव्या अशा आकांक्षाला बळ देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नेहमी शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. सिंचन, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक विमा आणि विविध कल्याणकारी योजना द्वारे सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कर्जमाफीचा हा निर्णय त्या प्रयत्नांना अधिक बळ ठरेल.
श्री वेताळ यांनी विश्वास व्यक्त केला की या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल.त्यांचे कर्जाचे ओझे कमी होईल आणि नव्या जोमाने शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण भूमिका बजावेल. रामकृष्ण वेताळ यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातही शेतकऱ्यांच्यासाठी भाजप किसान मोर्चा सातत्याने शासनाचे समावेशातून काम करत अशी ग्वाही दिली.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा निर्णय..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा आहे.प्रत्येक निर्णय हा महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. शेतकरी समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल. शेतकऱ्याला उन्नती आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारा हा निर्णय आहे .
– रामकृष्ण वेताळ
प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र



