Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबिझनेसब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स कराड केंद्राची नवीन कार्यकारिणी बिनविरोध : अध्यक्षपदी प्रियदर्शिनी देसले तर उपाध्यक्षापदी प्रियांका कणसे

कराड (हॅलो न्यूज) :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या कराड केंद्राच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. आर्किटेक्ट केंद्राच्या अध्यक्षापदी प्रियदर्शिनी देसले तर उपाध्यक्षापदी प्रियांका कणसे यांची वर्णी लागली आहे. सचिवपदी प्रमील प्रकाश पाटील आणि कोषाध्यक्षपदी आर्किटेक्ट नईम वायकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी समिती सदस्य म्हणून आर्किटेक्ट सिद्धिराज देसाई, आर्किटेक्ट कैलाश पाटील आणि आर्किटेक्ट क्षितिजा सिद्धिराज देसाई यांची बिनविरोध निवड झाली.

कराड व मलकापूर नगरपालिका क्षेत्राच्या नियोजित व शाश्वत विकासासाठी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्यात येणार आहे. नगररचना, विकास आराखडा तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये नगरपालिका प्रशासनासोबत समन्वय साधून आर्किटेक्ट्सना आवश्यक सहकार्य देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच आर्किटेक्ट्सना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक व ऑनलाइन पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा आर्किटेक्ट प्रियदर्शिनी देसले यांनी सांगितले की, “नवीन कार्यकारणी समोर येणारी विविध आव्हाने आम्ही एकसंघ म्हणून स्वीकारून सकारात्मक पद्धतीने काम करू. कराड व मलकापूरच्या विकासामध्ये आर्किटेक्ट्सची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच प्रत्येक आर्किटेक्टपर्यंत आवश्यक सहकार्य पोहोचविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.” नवनिर्वाचित कार्यकारिणीचे आर्किटेक्चर क्षेत्रातील मान्यवर व सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close